• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक ; गळा चिरून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 23, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धक्कादायक ; गळा चिरून धारदार शस्त्राने तरुणीची हत्या

घटनास्थळा जवळ काही अंतरावर आढळला तरुणाचा मृतदेह, धुळे शहरातील घटना

धुळे (प्रतिनिधी) – शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात एकटी असल्याचे पाहून अज्ञात व्यक्ताने घरात शिरून २२ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. तर तरुणीच्या घरापासून १०० मीटर अंतरावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना धुळे शहरातील नकाने परिसरातील बालाजी नगर येथे बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की , काल बुधवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास नकाने परिसरातील बालाजी नगर येथेनिकिता कल्याण पाटील (वय-२२) हि तरुणी घरात एकटीच होती. तिचे आई-वडील व भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान निकीता पाटील ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिची हत्या हि प्रेम संबंधातून झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समोर येत होती. निकिता पाटील हिचा भाऊ अनिकेत कल्याण पाटील याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश मराठे हा माझ्या बहिणीचा सातत्याने पाठलाग करीत होता. त्याने प्रेमसंबंधासाठी त्याने तगादा लावलेला होता. त्याला नकार दिल्याने बहिणीची हत्या केल्याचा संशय त्याच्यावर व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर महेश मराठे हा फरार आहे. त्यामुळे संशयाची सुई त्याच्यावर जात आहे.

आज दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस घटनास्थळी चौकशी करीत असतांना घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर  अनिकेत वाल्मिक बोरसे (वय-२६,रा. महालेनागर, मोगलाई, धुळे ) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ विषाची बाटली आढळल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पोलिसही संभ्रमात पडले आहेत. निकिता आणि अनिकेत बोरसे यांचा परिचय होता की, नाही या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे. अनिकेतच्या कपड्यावर रक्ताचे डाग मिळून आल्याचे समजते. हे रक्ताचे डाग निकिताचे असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त होत आहे. त्यामुळे निकिता पाटील हीच मारेकरी म्हणूनही अनिकेतकडे बहघितले जात आहे. त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे. निकिताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत महेश मराठे हा पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतरच सत्य परिस्तिथी बाहेर येण्याची शक्यता आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दत्तात्रय शिंदे यांच्यासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पो.नि. सतीश घोटेकर, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या पो. नि. संगीत राऊत, यांनी घटनास्थळी पाहणी केली.

डॉग स्कॉड, फॉरेन्सीक, ठसे तज्ज्ञांच्या पथकाकडून पुरावे गोळा करण्यात आले. घटनास्थळी यावेळी अनिकेतच्या मृतदेहाजवळ मोबाईल, सायकल तसेच विषाची बाटली पोलिसांना आढळून आली. तर काल निकिताच्या खुनानंतर चाकू घटनास्थळीच आढळला होता. त्यामुळे या दोन घटनांचा परस्पर काही संबंध आहे का, या दिशेने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

निकीता पाटील या तरुणीच्या खुनानंतर काही अंतरावरच आज सकाळी अनिकेत बोरसे या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्याच्याजवळ किटकनाशकाची बाटली देखील आढळली असून त्याने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. त्यामुळे खुन आणि आत्महत्या या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध आहे, या दिशेने पोलिसांनी तपासाला सुर केलेला आहे.

-किशोर काळे,
अपर पोलीस अधिक्षक, धुळे


 

 

Tags: #dhule crime newshttps://kesariraj.com/gala-chirun-tarunichi-hatya/
Previous Post

चोपड्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Next Post

एमआयडीसीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमआयडीसीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

एमआयडीसीत सुरक्षारक्षकाचा मृत्यू ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon