अंमळनेर / प्रतिनिधी,
तालुक्यात कोरोना चा वाढता धोका पाहता कडक निरबंध आहेत तरीही मारवड येथील रमेश पाटील यांचे शेतात गजानन पवार, राजेंद्र भदाणे,वासुदेव मारवडकर, धनश्याम बडगुजर, शब्बीर खाटीक, अनिल पाटील, बाळासाहेब साळुंखे, पंकज लोहार आदी कोरोना शारीरिक अंतराचे नियम धाब्यावर बसवून जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जुगार साहित्य व रोख रक्कम रु.२८,७८४/- सह कोरोना साथ रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असतांना, मास्क, रुमाल किंवा कपडा वगैरे बांधणेचे व अत्यावश्यक कारण वगळता विना कारण न फिरण्याचे आदेश असतांनाही शेतात जुगार खेळतांना आढळून आल्याने त्या सर्वांविरुध्द मारवड पो स्टे गुरनं./२० महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा क.१२(अ), भादंवि.क.१८८,२६९, साथ रोग प्रतिबंधक कायदा क.२,३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहा.फौजदार शिंदे व मुकेश साळुंखे करीत आहे.