जळगाव ( प्रतिनिधी ) रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून कुटुंबाची काळजी न करता परिचारिका लढा देत असतात.रुग्णांची काळजी करण्याचं महत्वाचं काम परिचारिका करतात. डॉक्टरांपेक्षा रुग्ण हा जास्त वेळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो.कोरोना सारख्या महाभयंकर युद्धात सर्व परिचारिका त्याला नमवण्यासाठी दिवस रात्र योगदान देत आहेत.
अशा सर्व नर्सेसना धर्मरथ फाउंडेशन व कुसुमताई फाउंडेशन तर्फे संपुर्ण चेहरा सुरक्षा किट व गुलाबपुष्प देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्या वेळी धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, कुसुमताई फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे,संतोष भीताडे,डॉ.तिलोत्तमा गाजरे,डॉ.भारंबे उपस्थित होते.