जळगाव एमआयडीसी पोलीसांची कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) तालुक्यातील वावडदा गावाजवळ एमआयडीसी पोलिसांनी आज दि 11 रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईत बेकायदेशीर कत्तली साठी नेण्यात येत असलेले 8 बैल ट्रकसह जप्त करून ट्रकचालक आणि क्लिनर ला अटक केली आहे .
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पो. कों. हेमंत पाटील यांनी दिलेल्या या कारवाई च्या फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली .
वावडदा ग्रामस्थ आणि पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती देऊन ही संशयित ट्रक वावडदा गावाजवळ रोखून धरली होती पोलिसांनी जप्त केलेले आठ बैल निगराणीसाठी कुसुंबा येथील आर सी बाफना गोशाळेकडे सुपूर्द केले आहेत या बैलांची अंदाजे किंमत 1 लाख 88 हजार रुपये नोंदविण्यात आली आहे जामनेर तालुक्यातील नेरी येथून मालेगाव येथे हे बैल नेले जात होते. पोलिसांनी आरोपी चालक आणि क्लिनर च्या ताब्यातील एम एच 18 एम 8888 क्रमांकाची ट्रक जप्त करून चालक इद्रिस खान याकूब खान आणि क्लिनर रिजवान खान इब्राहिम खान (दोघे रा – मालेगाव) यांना अटक केली आहे. फिर्यादी हेमंत पाटील यांच्यासह पोलीस उप निरीक्षक विशाल सोनवणे, पो ना शिवदास चौधरी, पो कों समाधान पाटील यांनी ही कारवाई केली