जळगाव – शहरातील इच्छादेवी चौकाजवळ सिध्दी कॉलनीकडे देशी आणि गावठी दारू विक्रीसाठी घेऊन जाणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,
सफौ अतुल वंजारी , सफौ आनंदसिंग पाटौल, पोहेंकॉ महेंद्रसिंग पाटील , नितीन पाटील , अशोक सनकत ,मुकेश पाटील, यानां मिळालेल्या माहितीनुसार इच्छादेवी मंदीर कडे दोन प्रकाश मितसिंग बावरी, वय 31 रा. सिकलकरवाडा तांबापुरा ,विकास अशोक शिंदे वय 28 रा सिकलकरवाडा जळगाव हे दुचाकी क्रमांक एमएच 19 डि.एच ८९१४ ने दोन प्लास्टिक कॅन मध्ये तयार गावठी हात भट्टी दारु घेवुन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर
या दोघांना इच्छादेवी चौकाजवळ अडवले असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळी हेकॉ मुकेश पाटील यांनी त्यांचा पाठलाग करून वाहनासह पकडले .
त्यांच्याकडून ३५ लिटर गावठी दारू, १९ बाटल्या देशी टॅगो दारू आणि मोटार सायकल ६३ हजार ८८ रुपयांचा माल मिळून आला .
या प्रमाणे वर नमुद इसम हे मो.सा. क्र एमएच-19 एच 8914 वर गैरकायदा तयार गा.ह.भ.ची दारु , देशी टँगो पंच
याबाबत दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोकॉ सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.