जळगाव;– लॉकडाऊनच्या काळात सर्वदूर बंद असताना मेहरूण शिवारातील शेतात पार्टी रंगली होती. त्या पार्टीत वाळूमाफिया आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पार्टीची सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेची नियुक्ती करावी अशी मागणी माहिती कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्याकडे केली आहे.
दरम्यान या पार्टीबाबत ३ आठवड्यांचा कालावधी उलटून देखील काहीच कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी या पार्टीची एलसीबीमार्फत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्याकडे केली आहे. या पार्टीला जसे नगरसेवक उपस्थित राहिले त्याच पद्धतीने वाळूमाफिया व पोलिस कर्मचारी देखील सामील झाले. त्यामुळे या संदर्भात प्रकरण दाबले जाईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्टीसदर्भात आपण गृहमंत्री, आयजी यांनाही ट्विटद्वारे करून कारवाईची मागणी केली आहे.