मुंबईत झाला सन्मान
भुसावळ (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांनी भुसावळ रेल्वे विभागाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत भुसावळ विभागाला चार पारितोषिक प्रदान केले. भुसावळसह मुंबईच्या १०९ कर्मचार्यांचा सन्मान केला. प्रसंगी भुसावळ विभागातील उत्कृष्ठ काम केलेल्या २ अधिकारी व १३ कर्मचार्यांना विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानीत केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भुसावळ विभागातील अधिकारी मंडल सिग्नल व दूर संचार अभियंता कृष्णा शंखधर, सहायक मॅकेनिकल अभियंता मयुर वाघुले यांच्यासह १३ कर्मचार्यांना गौरविण्यात आले. यात मुजाहिद खान (वित्त विभाग), विनय ओझा (वाणिज्य विभाग), के.एल. चौरे, वासुदेव पाटील (विद्युत विभाग), सत्तार अब्दुल खान (सिव्हील विभाग), अनिल चंचल (निर्माण विभाग), सुहास चौधरी (मेकॅनिकल विभाग), मुकूंद पाटील (झेडआरटीआय), शेख मुजम्मील (परीचालन विभाग), इमरान खान (सुरक्षा विभाग), गिरीश पाटील (सिग्नल विभाग), भाग्यश्री कुलकर्णी (कार्मिक विभाग), योगेश बारी (प्रशासन विभाग) यांचा गौरव करण्यात आला.
भुसावळ विभागाला २०२२-२३ या वर्षासाठी विभाग, कार्यशाळा आणि रेल्वे स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता शिल्ड प्रदान करण्यात आली. त्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय कार्यक्षमता, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल कार्यशाळा, भुसावळ इलेक्ट्रिक लोको कार्यशाळा, यांत्रिक कार्यक्षमता (मुंबई आणि भुसावळ विभाग संयुक्तपणे), सर्वोत्तम बांधकाम युनिटसाठी भुसावळ विभाग यांचा समावेश आहे.