• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मराठा, कोळी समाजानंतर न्यायहक्कासाठी आता तृतीयपंथीयांचे बेमुदत उपोषण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 30, 2023
in खान्देश, जळगाव
0

जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापुरुषांना माल्यार्पण करून सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यभरात तसेच जळगाव जळात मराठा, कोळी समाजाने उपोषण सुरु करून न्यायहक्क द्या म्हणून शासनाकडे मागणी केली आहे. त्यातच आता जळगावातदेखील तृतीयपंथी नागरिकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप टाकून राज्यस्तरीय उपोषण सुरु केले आहे.

तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका तृतीयपंथीयांनी घेतली आहे. राज्य समन्वयक शमिभा पाटील, पार्वती जोगी गुरू (धुळे), मयूरी आळेकर (कोल्हापूर) यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी, उपोषणकर्त्यांनी महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. उपोषणकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.

राज्य समन्वयक पाटील यांनी सांगितले की, पोलीस भरती व इतर शासकीय नोकरीत जाती प्रवर्गाप्रमाणे महिलांसाठी आरक्षण राखीव असते, त्याप्रमाणे तृतीयपंथी राखीव अशी तरतूद करावी. राज्य शासनाने ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील तृतीयपंथी या घटकातील वर्गास शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांमध्ये लिंग या पर्यायात स्त्री-पुरुषासोबत तृतीयपंथी हा पर्याय खुला ठेवावा, असे म्हटले आहे. मात्र, पोलीस भरतीनंतर राज्यभरात विविध विभागांतील तलाठी, दारूबंदी पोलीस, वनरक्षक अशा वेगवेगळ्या शासकीय स्तरावरील नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात आल्या.

तरी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून शासकीय स्तरावरील सर्वच विभागांत यात विशेष तरतूद करीत तृतीयपंथी समुदायाला सामावून घ्यावे. राज्याच्या तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळाचे सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर जिल्हास्तरावरून चालणाऱ्या कामकाजासाठी कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून स्वतंत्र विभाग करावा. तेथे कर्मचारी म्हणून जिल्हास्तरावर शिक्षणाची पात्रता असलेल्या पदवीधऱ अशा तृतीयपंथी व्यक्तीस संधी द्यावी. शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला विशेष शिष्यवृत्ती द्यावी. शैक्षणिक शुल्क माफी द्यावी, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांत तृतीयपंथींसाठी रहिवास व भोजन, तसेच मासिक वैयक्तिक शिक्षणांसह आवश्यक गरजांसाठी मासिक पाच हजार रुपये भत्ता द्यावा.

उच्चशिक्षण तसेच विदेशात शिक्षणासाठी पात्र तृतीयपंथी व्यक्तीस विशेष अर्थसहाय्य द्यावे. घरकुलासह इतर आवास योजनांमध्ये महानगर-शहर-निमशहर-ग्रामीण यात तृतीयपंथी व्यक्तीस जागेसह योजनांचा लाभ द्यावा. यासाठी असलेली कागदपत्रे व इतर अटी शिथिल कराव्यात, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. राज्य शासन याविषयी उदासीन असल्याचे दिसून येत असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठा, कोळी समाजानंतर तृतीयपंथी समाजाने उपोषण सुरु केल्याने राज्यातील शिंदे- फडणवीस-पवार सरकार चांगलेच घेरले  गेले आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/trutiypanthiyanche-uphoshan/#jalgaon news #maharashtra
Previous Post

पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या उपयोगितेवर कार्यशाळा

Next Post

जळगावचे ॲड. मुकुंद जाधव यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावचे ॲड. मुकुंद जाधव यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाणीपुरवठा योजनेच्या अर्जावरून वाद; ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण

August 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

उड्डाणपुलाजवळून कारसह ७५ हजारांचा ऐवज चोरी

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon