जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- दुचाकी चोरी करणारी टोळी एमआयडीसी पोलिसांनी पकडली आहे. अगदी २० ते २१ वयोगटातील हे संशयित आरोपी असून त्यांनी चार जिल्ह्यातून ९ दुचाकी चोरल्या असल्याचा तपास पोलिसांनी लावला आहे. त्यानुसार ४ तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
भुषण दिलीप पाटील रा. जुने जळगाव यांची दुचाकी एमआयडीसी परीसरात काम करत असलेल्या विनय प्लास्टीक कंपनीजवळ लावली होती. हीरो सुपर स्प्लेंडर मो सा. क्र. एम.एच १९ डीवाय ८४९० ही दुचाकी चोरीस गेली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला चोरीची फिर्याद त्यांनी दिली होती. त्याचा तपास सुरु होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना बातमी मिळाली कि, मेहरुण परीसरातील काही तरुण मुल हे बाहेर गावावरुन महागडया मोटार सायकली चोरी करुन आणल्या आहे. तसेच, त्या विकण्याच्या तयारीत आहे. या आधारावरुन पोउनी दिपक जगदाळे, सफौ. अतुल कंजारी, पोहेका. गणेश शिरसाळे, पोना. योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, पोका. छगन तायडे, किरण पाटील, ललीत नारखेडे अशांनी सदर परीसरात माहिती घेतली.
त्यानुसार संशयित आरोपी दानीश शेख कलीम (वय २० वर्ष, रा. पिरजादेवाडा, मेहरुण), सोमनाथ जगदीश खत्री (वय २१ वर्ष, रा जोशी वाडा, मेहरुण) आवेश बाबुलाल पिंजारी (वय २० वर्ष, रा. जोशी वाडा, मेहरुण) व एक विधीसंघर्ष बालक (अल्पवयीन) यांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले. त्यांची बारकाईने विचारपुस करता त्यांनी ढोर मार्केट परीसरातून एक हिरो होंडा सुपर स्प्लेंडर आणी पारोळा, औरंगाबाद, नाशिक, बिड येथुन सुध्दा ब-याच मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रीमांड घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.