जळगाव तालुक्यात शिरसोली येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षाचे पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सरपंच हिलाल आप्पा भिल, विकासो चेअरमन ॲड.विजय बारी, उपसरपंच मुदस्सर पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत बारी, मिठाराम पाटील, राजू ताडे, अर्जुन पवार, समाधान बोबडे, रविंद्र बारी, उत्तम महाजन, रमाकांत पाटील, मनोज कदम, सागर पाटील, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यालय संपर्क म्हणून भुषण पाटील (राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस) हे राहतील. तर राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्षपदी सचिन बारी (अस्वार) यांची निवड करण्यात आली.