धरणगाव (प्रतिनिधी) :- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त” वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळामार्फत “वाणिज्य व अर्थशास्त्र संशोधन पद्धती” या विषयावर डॉ जगतराव धनगर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बी शिंगाणे अध्यक्षस्थानी होते. आयक्यूएसी समन्वयक प्रा एस. एस. पालखे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

संशोधन म्हणजे काय, संशोधन नेमके कसे करावे याची सुरुवात समस्या शोधनपासून ते निष्कर्षापर्यंत क्रमबद्ध पद्धतीने विविध टप्प्यांमध्ये अध्ययन कसे करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस. बी. शिंगाणे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. हर्षवर्धन भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.