• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कामाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, एक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगावात एमआयडीसी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी हजर झाल्यावर काम करीत असताना विजेचा धक्का लागल्याने एका २२ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहूल दरबार राठोड (वय-२२, रा. शेलगाव ता.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर, जळगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर जीवन गजानन चौधरी (वय २०, रा. बेटावद ता. जामनेर) असे जखमी झालेल्या दुसऱ्या कामगाराचे नाव आहे. राहूल राठोड हा तरूण गेल्या २० वर्षांपासून आईवडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी कंपनीत काम करत असताना मशीनमुळे विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

तर त्याच्यासोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी केली असता राहुल राठोड याला मयत घोषीत केले. तर जखमीस खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मयत राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर ते काम सोडून सोमवारपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरातील कर्तापुरूष गेल्याने शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. मयताच्या पश्चात आई कौसल, वडील दरबार भिका राठाडे, लहान भाऊ अर्जून आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vijechya-dhakkyane-mrutu-3/
Previous Post

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्ट माधुरी कानिटकर यांच्या जन्मदिनानिमित्‍त रक्‍तदान शिबिर

Next Post

धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धरणगाव महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात
1xbet russia

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

April 24, 2026
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1xbet russia

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon