इसमाची आत्महत्या, जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना
जळगाव प्रतिनिधी) : – तालुक्यातील भोकर येथे एका शेतमजुराने शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस झाली आहे मुलगा प्रकाश हा शौचालयात गेला असता त्याला त्याचे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बहादूर रेमसिंग बारेला (वय ५३, रा. पलासोद जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. तो जळगाव तालुक्यातील भोकर येथे पत्नी, तीन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होता. गावात शेतमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी पहाटे ५ वाजेनंतर कधीतरी त्यांचा मुलगा प्रकाश बारेला हा शौचालयासाठी गेला असता त्याचे वडील बहादूर बारेला यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याला दिसून आले.
त्यावेळी प्रकाशने हंबरडा फोडला. आजूबाजूचा नागरिकांनी बहादूर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला मयत घोषित केले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.