चोपडा शहरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) :- शहरातील शनी मंदिर परिसरातून भरदिवसा दुचाकीला टांगलेल्या बॅगेतून २ लाख ३० हजार रुपये लंपास करून अज्ञात चोरटे पसार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा आहे.
शहरातील शनी मंदिरा समोर समीक्षा ड्रायफ्रूट या दुकानावर महेश पतसंस्थाचे कर्मचारी शरद रामदास बाविस्कर हे दररोज प्रमाणे पैसे घेण्यासाठी आले होते. बाविस्कर एचआर पावती फाडण्यासाठी गेले असता दुचाकी (एमएच १९ डी वाय ८४७५) ला लागलेली बॅग घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. त्यात महेश पतसंस्थेतून वितरण केलेले किरण शिंपी यांचे १ लाख रुपये आणि शरद बाविस्कर यांचा पगार असे एकूण २ लाख ३० हजार रुपये रोख लंपास झाले. याबाबत चोपडा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनास्थळी डीवायएसपी ऋषिकेश रावले, पोलिस निरीक्षक कविता कमलाकर यांच्यासह सर्व अधिकारी पोहचले. दरम्यान, तीन चोरटे होते, त्यापैकी एकाने बॅग उचलली आणि थोड्याच अंतरावर उभी असलेल्या दुचाकीवरून तिघं धूम स्टाईल पसार झालेत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे तपास करीत आहे.