पाचोरा (प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिंदाड गावातून एका पंधरा वर्षे मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिंदाड येथे हात मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तीची एक पंधरा वर्षीय मुलीला २७ रोजी रात्री ९ ते २८ रोजी च्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण ब्राह्मणे करीत आहे.