मुंबई – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात केलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये अडकलेले एकूण 329 भारतीय नागरिक आज एअर इंडियाच्या विमानाने भारतात परतले. शनिवारी रात्री लंडनहून निघालेले विशेष विमान रविवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
या विमानामध्ये आलेले 65 जण पुण्याला, 16 जण अमरावती, अहमदनगर, अकोला, बीड, गोंदिया, गोवा येथे जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी मुंबईमधल्या प्रवाशांसाठी बेस्ट बसची तर मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी एस. टी. बसची सोय करण्यात आली आहे. ‘मिशन वंदे भारत’ अंतर्गत या प्रवाशांना भारतात आणण्यात आले.