जळगाव (प्रतिनिधी) : येथील साईलीला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटलतर्फे एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना दि. २३ सप्टेंबर रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधत “ आयुष्यमान दिवस ” साजरा केला जात आहे. यानिमित्त आरोग्य शिबीर २३ रोजी सकाळी १० ते २ दरम्यान घेण्यात येत आहे. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
एकत्रित आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेला दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी ५ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त साईलीला हॉस्पिटल ॲग्लो उर्दू स्कूल,प्रताप नगर जळगाव येथे “ आयुष्यमान दिवस ” साजरा करीत आहे. यानिमित्त आरोग्य, जनजागृती शिबीर आणि निरनिराळ्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. योजनेअंतर्गत ५ लाख पर्यंत हाडावरील शत्रक्रिया तसेच उपचार मोफत करण्यात येतील आणि नागरिकांना या योजनेबद्दल माहितीही देण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा तसेच स्पर्धा यांचा लाभ घ्यावा असे श्री साईलीला अक्सिडेट हॉस्पिटल, प्रताप नगर, जळगाव यांचेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.