पहुर.ता.जामनेर-कोविड१९या कोरोना विषाणू ने जगभरासह देशात, राज्यासह जिल्ह्यात ही हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना वृत्ताकंन करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना या संसर्गजन्य विषाणू पासून पत्रकारांना आपले संरक्षण करता यावे यासाठी पहुर येथील कृषी पंडीत पतसंस्थेतर्फे सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रदीप लोढा, चेअरमन बाबुराव पांढरे,शाम सावळे,व्यवस्थापक कैलास पाटील, अशोक देठे,यांच्या उपस्थितित पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश पांढरे, शरद बेलपत्रे, किरण जोशी,सादीक शेख आदी पत्रकारांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.