पहूर, ता.जामनेर (वार्ताहर ) पहूर पेठ येथे आज सकाळी सहा वाजेपुर्वी अज्ञात चोरटय़ांनी सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रूपये रोख असे एकूण नव्वद हजार रुपये ची चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पेठ येथील प्रकाश भिकन भोई यांची बहीण ही पहूर पेठ गावात राहते. आज 9 मे 2020 रोजी सकाळी सहा वाजेपुर्वी अज्ञात चोरट्यांनी बहीनीच्या घरातील उघड्या दरवाज्याजवळ घरातून सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, तोंगल,पोत, असे सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रूपये रोख असे एकूण नव्वद हजार रुपये घेऊन पोबारा केला. याबाबत प्रकाश भिकन भोई यांनी पहूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल अहिरे तपास करीत आहे. गेल्या दोन दिवसांत पहूर येथील ही चोरीची दुसरी घटना असून यामुळे लोक भयभीत झाले आहे.