यावल तालुक्यातील मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – येथील मनवेल येथील एका भाजी विक्रेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितिन अमृत कोळी, (वय ३१, मनवेल ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. भाजीपाला विक्री करून आपला प्रपंच चालवित होता. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याने सोमवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्यापुर्वी राहत्या घरात साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मयताचे काका शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .