भुसावळ (प्रतिनिधी) – मंडळ कार्यालयमध्ये रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ, रेल सिटी द्वारा तणाव व्यवस्थापन तंत्र सेमिनार आज दि. १८ रोजी आयोजित करण्यात आलें होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शन डॉ. योगिता पांडे यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तणाव मुक्त जीवन कसे जगायचे यामध्ये डॉ. योगिता पांडे यांनी मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये मंडळ रेल प्रबंधक इति पाण्डेय, अप्पर मंडळ रेल प्रबंधक प्रशासन सुनील कुमार सुमन, अप्पर मंडळ रेल प्रबंधक तांत्रिक कौशेलेंद्र कुमार, सर्व शाखाचे अधिकारी आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ, रेल सिटीचे सदस्य उपस्थित होते. मंडळ रेल प्रबंधक इति पाण्डेयद्वारा डॉ. योगिता पांडे यांचा सत्कार करण्यात आला.