जळगाव एमआयडीसीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी भागात सेक्टर नंबर डी ९९ मध्ये असलेल्या ऑइल मिलच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरटयांनी अँल्युमिनीअमची पट्टीचे बंडल आणि तांब्याच्या वायरचे बंडल, रोकड लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास डिगंबर महाले (वय ५२ वर्षे, रा. जोशीपेठ, जळगाव) हे कुटुंबासह राहतात. त्यांची सेक्टर नंबर डी ९९ एमआयडीसी, जळगाव येथे श्री गोपाल कृष्ण इंडस्ट्रीज नावाची आईलमिल असुन आईल मिलच्या लागुनच गोडावून आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९. ३० वाजेच्या सुमारास विलास महाले हे आले असता गोडावून मध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. १७ हजार २४० रोख, ३० हजार पॉलीकम कंपनीच्या तांब्याच्या वायरचे बंडल ७ नग १० हजार किंमतीचे कॉपर आणि १२ हजार रु. किंमतीचे अल्युमिनीअमची आर्थिग पट्टीचे १ बंडल असा एकूण ६९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला १६ रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे .