जळगाव;- शहरातील रायसोनीनगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.असून
संगीता खेमचंद चव्हाण (वय १७, रा.रायसोनीनगर) असे मृत मुलीचे नाव आहे. संगीता ही दोन भाऊ व वडील यांच्यासोबत राहत होती. तीच्या आईचे निधन झाले असल्यामुळे वडील, भावांसाठी आईप्रमाणे संगीता घरात राबत होती. दरम्यान, ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता संगीताने राहत्या घरात गळफास घेतला. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर अत्यवस्थ स्थितीत तीला गोदावरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले. उपचार सुरू असताना रात्री ९.३० वाजता तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, विश्वनाथ गायकवाड, अनिल फेगडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संगीताने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.