अमळनेर (प्रतिनिधी) – शहरात तिरुपती बालाजी स्पोर्टस क्लब,अमळनेर शाखा या नावाने क्रिडा संस्था चालु असुन सदर क्रिडा संस्थेत स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने सदर ठिकाणी छापा टाकून मुद्देमाल हस्तगत केला.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स मधील गाळा नंबर 25 मध्ये सुरेद्र पंढरीनाथ फालक याचे मालकाच्या गाळ्यामध्ये चालु असलेल्या तिरुपती बालाजी स्पोर्टस क्लब अमळनेर शाखा या ठिकाणी अनेक दिवसांपासून झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक आंबदास मोरे यांना मिळाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही केली. त्या ठिकाणी पत्ता जुगाराची 1 लाख 11 हजार 7 रुपयाची साधने व रोख रुपये मिळुन आली आहे. दरम्यान यात सुमारे 12 लोकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी हे करीत आहेत.