जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ६ वर बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी प्रौढ व्यक्तीचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ४० मिनीटांनी घटली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे.
जळगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ६ वर अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी प्रौढ व्यक्ती हे बुधवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री बेशुध्दावस्थेत आढळून आले. त्यांना रेल्वे पोलीसांनी तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र चौधरी हे करीत आहे.