औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता मनपातर्फे शहर कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दर दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात औरंगाबादकरांनी सोयीनुसार सहभागी व्हायचे आहे. नेमके काय आहे हे रोज होणारे उपक्रम जाणून घेऊया…
11 मे, सोमवार
सामूहिक शपथ
12 मे, मंगळवार
जनजागृती, गीत गायन
13 मे, बुधवार
दीपोत्सव
14 मे, गुरुवार
कोविड योध्यांचे अभिनंदन दिवस
15 मे, शुक्रवार
अँटी कोरोना पोलीस स्थापन दिवस
16 मे, शनिवार
स्वतः चा सन्मान दिवस
17 मे, रविवार
माझे गुरू माझा आदर्श दिवस
18 मे, सोमवार
सामूहिक गायन दिवस
19 मे, मंगळवार
निबंध लेखन, चित्र काढणे दिवस
20 मे, बुधवार
रंगोत्सव
21 मे, गुरुवार
माझे आरोग्य माझ्या हाती
22 मे, शुक्रवार
मीच माझा रक्षक
23 मे,शनिवार
दो गज दुरी
24 मे, रविवार
आनंदोत्सव दिवस