नवी दिल्ली(वृत्तसंस्था ) : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता एअर इंडियाचे पाच पायलट कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे एअर इंडियाद्वारे सुरु असलेल्या ‘वंदे भारत मिशन’ या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.
एअर इंडियाचे हे पाचही पायलट मुंबईत आहेत. हे पायलट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच, एअर इंडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पायलट कार्गो विमान घेऊन काही दिवसांपूर्वी चीनला गेले होते.