सव्वा तीन लाखांना लुटले, जळगावातील घटना
जळगव (प्रतिनिधी) :- सायबर क्राईम पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला एक पार्सल गेले आहे. त्यात ड्रक्स आहे, तुमच्या बँकेची डिटेल द्या असे सांगून एका ३२ वर्षीय महिलेला सव्वा तीन लाखाला ऑनलाईन फसविण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा विजयानंद पवार (वय ३२, रा. द्रौपदी नगर, जळगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या खाजगी आस्थापनेत नोकरी करतात. त्यांना दि. ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०५.१८ वा.चे सुमारास मोबाईल नंबरवर फेडेक्स कुरीअर कंपनी मधिल एक अनोळखी इसमाने त्याचा मोबाईल नंबर वरुन फोन केला. तुमचे नावाने अंधेरी मुंबई येथुन तैवान येथे एक पार्सल गेले आहे. त्यात तुमचे कपडे, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट, ड्रक्स आहे. ड्रक्स असल्यामुळे सदर पार्सल हे परत आलेले आहे, असे खोटे भासवले.
नंतर त्याने फिर्यादीशी सायबर क्राईम पोलीस स्टेशनच्या फोनवरुन बोलणे करून फिर्यादीचे बँकची माहीती घेतली. नंतर चलाखीने फिर्यादीचे बँक अकाऊन्टमधुन ३ लाख २६ हजार ८७ रुपये काढून घेत फसवणुक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ऋतुजा पवार यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास महिला पोना सुवर्णा तायडे करीत आहे.