पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचे तब्बल 18 रूग्ण निष्पन्न झाल्यानंतर हादरलेल्या पोचोरा शहरात आज संचारबंदीसारखाच शुकशुकाट दिसत आहे. शहरातील या 18 पैकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पाचोर्यातील टाऊन हॉल परिसर, जामनेर रोड भाग, जीन परिसरासह नेहमी वर्दळ असलेल्या बाजारपेठेतही सर्वत्र रस्ते ओस पडलेले होते. जिल्ह्यात भुसावळ , अमळनेर, जळगाव शहरांतील रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या बातम्यांमुळेही पाचोर्यात या आजाराची दहशत आता वाढलेली आहे. पोलिस व आरोग्य खात्याने या शहरावरही लक्ष केंद्रित केलेले असल्याने यापुढे निष्काळजीपणा परवडणार नाही याची जाणिव आता पाचोरेकरांना झाली पाहीजे, असे पशासनातील अधिकारी सांगत आहेत.