जळगाव ( प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावरच्या खेडी परिसरात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून नागपूरकडे जाणारा भारत गॅस कंपनीचा टँकर पलटी झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा भरधाव टँकर महामार्गालगतच्या एका वीज खांबाला व झाडाला धडकून नंतर पलटी झाला. टँकर पलटी झाल्यावर मोठी दुर्घटना घडण्याच्या भितीने टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी शाोधून थोड्याच वेळात ताब्यात घेतले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही. पोलिसांनी माहिती दिल्यावर भारत गॅस कंपनीचे अधिकारी मनोज वर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. स.पो.नि. अमोल मोरे , पो.कॉ. हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी, भूषण सोनार हे पुढील तपास करीत आहेत.