भुसावळ ( प्रतिनिधी) – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाडू माती पासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी ‘इको फ्रेंडली’ गणपतीचे महत्त्व सांगून मुलांना त्यांच्या घरी शाडू मातीची म्हणजेच ‘इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करण्यास कार्यशाळेच्या माध्यमातून सांगण्यात आले. पर्यावरणाला सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे हे ही मुलांना समजाविण्यात आले. ही कार्यशाळा राजेश बडगुजर, तुषार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्यात. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








