भुसावळ ( प्रतिनिधी) – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, भुसावळ येथे उत्साहाच्या वातावरणात जन्माष्टमी साजरी करण्यात आली.

श्री कृष्ण जन्माच्या दिवशी शाळेतील बालगोपालांनी कृष्ण व राधा यांची वेशभूषा परिधान करून उत्सवात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका अनघा पाटील ह्या उपस्थित होत्या. भक्ती पूर्ण वातावरणात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी कृष्णाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली.