जळगाव ( प्रतिनिधी) – महापालिकेला शासनाकडून मुद्रांक शुल्काच्या १ टक्के रक्कम (दोन कोटी १३ लक्ष रूपये) मिळणार असून दहा दिवसांच्या ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीतील मालमत्तांची खरेदी- विक्री व हस्तांतरण करण्यावर शासनाकडून मुद्रांक शुल्क आकारणी केली जाते. त्यात मोठ्या शहरासाठी (महापालिका क्षेत्रासाठी) १ टक्के अधिभार आकारला जात असतो. ही रक्कम शासनाकडे जमा झाल्यानंतर शासनाकडून सदर अधिभाराची रक्कम महापालिकांना वितरीत केली जाते. त्यानुसार यावर्षी जळगाव महापालिकेला १ टक्के अधिभाराची रक्कम म्हणजेच २ कोटी १३ लक्ष २१ हजार ८७४ रुपये इतकी वर्ग केली जाणार आहे.
या संदर्भांतील दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे.