जळगाव – कानडदा रोडवरील राधारमण अपार्टमेंटमधील खुशी बिअर शॉपीवर अज्ञात तीन जणांनी तोडफोड करीत बिअरच्या खाली बाटल्या फोडून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना काल दि. 9 रोजी सायंकाळी घडली.
कानळदा रोगवरील शंभर फुटी रस्त्याजवळील राधारमण अपार्टमेंटमध्ये योगेश साळी यांच्या मालकीचे खुशी बिअर शाँपी असुन काल सायकाळी सात वाजेच्या सुमारास दुकान बंद झाल्यानंतर कोणतेही कारण नसताना अज्ञात तीन जणांनी दुकानात येवून तोडफोड करीत बिअरच्या खाली बाटल्या फोडल्या.तसेच या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आढळून आले आहे. योगेश साळी यांच्या तक्रारी वरुन जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.