धुळे – देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना मजूरांचे हाल होत आहेत.दोन महिन्यांपासून हाताला काम नाही.स्वत: जवळील पैसे संपले लॉक डाऊन वाढण्याची शक्यता वाढल्याने मुळचा उत्तर प्रदेश मध्ये राहणारा मजूर हा त्रासून मुला सोबत मुंबई हून उत्तर प्रदेश कडे पायी चालत निघाला व आज शनिवारी धुळे महामार्गाने सायंकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल चंडिकाई माता समोरील पटांगणा जवळ चालत आल्यावर मजूराला थकवा जाणवत असल्याने दोघेही तेथील आवारातील झाडा खाली थांबले होते.याचवेळी वृध्द मजूराला तिव्रपणे ह्रदय विकाराचा झटका आला.त्यातच मजूराचा मृत्यू झाला.
हि माहिती चाळीसगाव रोड पोलीस यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.मजूराचा मृतदेह व सोबत आलेल्या मुलाला रुग्णवाहिकेतून चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठविण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले आहे. मृत मजूरांचे नाव रामउजागिर रामअचल यादव वय 50. चाळीगावरोड पोलीस ठाण्यात उशीरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.