दिपककुमार गुप्ता यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर
पत्रपरिषदेत दिली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांचेवर शहर पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अन्वये दाखल गुन्ह्यात अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी गुरुवारी ३१ रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
फिर्यादी नामे योगिता जितेंद्र ठाकूर रा. जळगाव यांनी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांचेवर क्र. २६२/२०२३ नुसार शहर पोलीस स्टेशन येथे दि. २५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केलेला होता. त्यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांना तत्काळ करून २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. न्यायालयाने सर्व बाबी तपासून अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदर अटकपूर्व जामीन अर्ज मिळणे कामी अॅड. जयंत बी. मोरे यांनी गुप्ता यांची बाजू मांडली.
फिर्यादी यांनी त्यांचे पती यांचे सोबत संगनमत करून अर्जदार यांचेवर विरुद्ध खोटा गुन्हा हा दाखल केलेला आहे. अशी माहिती दिपककुमार गुप्ता यांनी पत्रकारांना गुरुवारी दिली आहे. कोर्टाने दीपककुमार गुप्ता यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दि. २८ ऑगस्ट रोजी मंजूर केला आहे.