नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – औरंगाबाद रेल्वे अपघात प्रकरणानंतर कॉंग्रेस नेत्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. त्यात आता कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्र सरकारला काही आवाहन केली आहेत. स्थलांतरित मजुरांच्या मदत आणि बचावाच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्यासाठी एका मल्टिमॉडल एजन्सीची स्थापना करावी, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. गरज पडल्यास सरकारने सशस्त्र दलांचा आधारही घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले.
I request the govt to constitute a multimodal agency under a senior Cabinet Minister to oversee relief & rescue of migrants
If need be even support of Armed Forces must be sought to solve this humanitarian crisis
Clearly the Railway Ministry is unable to handle the problem
– Ahmed Patel (@ahmedpatel) May 9, 2020
औरंगाबाद रेल्वे अपघाताच्या एक दिवसानंतर कॉंग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारला चांगलेचं फटकारले आहे. औरंगाबाद आणि जालन्याच्यामध्ये 16 जण हे रेल्वे मार्गाने आपल्या गावी मध्यप्रदेशला चालत जात होते. मात्र चालून दमल्यामुळे ही मंडळी रेल्वे रुळावरचं झोपी गेली. मात्र दुर्दौवाने त्याच रुळावरून एक मालगाडी आली आणि या मंडळींना चिरडून गेली, अशी माहिती करमाड पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या घटने नंतर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय हे टीकेच्या केंद्र स्थानी आले. मात्र केंद्र सरकारकडून रेल्वेच्या विशेष श्रमिक गाड्या सुरु केल्या आहेत. जेणेकरून परराज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आपल्या घरी जाऊ शकतील या कारणाने रेल्वेने काही गाड्या सोडल्या आहेत.
तरीदेखील काही मजूर हे घरी जाण्यासाठी पायी वारीचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मजूर हे मोठ्या संख्येने रस्त्यावर झोपताना दिसत आहेत. तर दिवसा पायी चालताना दिसत आहेत. तरी महाराष्ट्र राज्य सरकारने या मजुरांना आश्वस्त केले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच तुमच्या जाण्याची व्यवस्था करणार आहोत, असे विश्वासाने सांगितले आहे.