औरंगाबाद (वृत्तसंस्था) – शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना आहे. आज सकाळीही 17 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 500 च्या घरात गेली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही 495 वर केली आहे. यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे.
आता नवे सापडलेले रुग्ण हे संजयनगर 6, कटकट गेट 2, बाबर कॉलनी 4, असेफीया 1, भवानीनगर 2, रामनगर (मुकुंदवाडी) 1, सिल्क मिल्क कॉलनी 1 या परिसरातील आहेत. तर शुक्रवारी अचानक 100 कोरोना रुग्ण शहरात वाढले होते.