फलटण (प्रतिनिधी) – शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे निवृत्त पोलीस उप अधीक्षक अरविंद गुलाबराव माने (वय, ६५ रा. लक्ष्मीनगर) यांनी शनिवारी पहाटे तीन वाजता घराच्या गच्चीवजा टेरेसवर छताला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
याबाबतची माहिती त्यांच्या मोठ्या भावाने पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रथमदर्शनी पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहलेल्या चिठ्ठीवरून व चौकशीवरुन दिसून येत आहे.
त्यांच्या घरी पत्नी, मुलगा, सुन व नातवंडे आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. गिरी अधिक तपास करीत आहेत.