जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील सावखेडा शिवारातील जिजाऊ नगर मध्ये बंद घराचे दरवाज्याचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून घरात कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार तीस रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सावखेडा शिवारात राहणारे जिजाऊ नगर मधील प्रकाश भगवान खैरनार व 48 हे व्यापारी असून त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याची पोत, 3500 रुपयांचे चांदीचे लक्ष्मी आणि गणपती देवाचे शिक्के, लक्ष्मीची मूर्ती आणि वीस हजार रुपयांची रोकड असा एकूण 38 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहे.