जळगाव (प्रतिनिधी ) –लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित रमाई फाउंडेशन, जळगावच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या हस्ते अभिवादन
लोकशाहीर,समाजसुधारक,लेखक,कवी अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) यांच्या १०३ व्या जयंती निमित रमाई फाउंडेशन, जळगावच्या वतीने जळगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अहिरे, सचिव अॅड. आनंद महाजन, दिपककुमार गुप्ता हेमंत भंगाळे तसेच संस्थेचे सदस्य उपस्थित होते.