जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील निवडणूक
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे सरपंच प्रवीण अशोक बारी यांनी ३ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी शुक्रवारी २८ जुलै रोजी सरपंच निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये सरपंचपदी सीमा प्रवीण पाटील बहुमताने निवडून आल्या. त्यांना १७ पैकी १० मते मिळाली. विरोधी उमेदवार आशा सुरेश बारी यांना ६ व १ मत बाद झाले. इतर उमेदवार उषा अर्जुन पवार, श्रद्धा प्रशांत काटोले यांनी वेळेवर माघार घेतली.
सविस्तर माहिती अशी कि, सरपंच प्रवीण अशोक बारी यांनी सरपंच पदाचा राजीनामा ठरलेल्या कालावधीप्रमाणे पंचायत समिती गटविकास अधिकारी भरत कोसोदे यांचेकडे ३ जुलै रोजी दिला होता. त्यानुसार सरपंच निवड प्रक्रिया अपेक्षित होती. शुक्रवारी २८ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी ४ नामनिर्देशन आले होते. यात सीमा प्रवीण पाटील, उषा अर्जुन पवार, श्रद्धा प्रशांत काटोले व आशा सुरेश बारी यांनी सहभाग घेतला. पिठासिन अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, तलाठी सारिका दुरगुडे, ग्रामविकास अधिकारी दिलीप जगन्नाथ पाटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी माजी पंचायती समिती सभापती नंदलाल पाटील, प्रदीप पाटील, ॲड. विजय काटोले, मुरलीधर ढेंगे, प्रवीण अशोक बारी, प्रशांत काटोले, नंदलाल वराडे, राजू लोटू ताडे, गोरख बारी, रमजान खाटीक, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कोळी, रईस शेख, अबू खाटीक, सुनील पाटील, नितीन बुधे, प्रविण उत्तमराव पाटील, सुधीर पाटील यांनी अभिनंदन केले. यानिवडणूक प्रक्रिया कामी लिपिक तुषार अस्वार, चिंधू बारी, शिपाई दीपक नन्नवरे यांनी सहकार्य केले.