चोपडा (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरस (कोविड- 19)ची साथ चालू असतांना देखील वर्डी गावात व परिसरात अविरत सेवा देणारे डॉक्टरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत पी.पी.ई किट वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह संदीप साळुखे, उपखंड प्रमुख गौरव नाथ मंडळ प्रमुख नितिन धनगर, व स्वयंसेवक पवन पाटील, मार्तंड कोळी उपस्थित होते.








