फैजपूर शहरातील घटना
फैजपूर (प्रतिनिधी) – खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करून आज्ञा चोरट्यांनी 47 हजार रुपयांची रोकड लांबविण्याची घटना फैजपुर शहरातील गजानन वाडी येथे घडली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भुसावळ रोडवरील गजानन वाडी येथे अमोल दिलीप माहुरकर ( वय – 42 ) हे व्यापारी असून त्यांच्या घराचे 22 जुलै रोजी रात्री साडेबारा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करून घरात बेडरूम मध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातून 47 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अमोल माहूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन हबीब सय्यद करीत आहे.