जळगाव (प्रतिनिधी) – काेराेना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धूलीवंदनाला विक्रीस अालेले रंग चीनकडून अालेले असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी रंग खेळताना सावधगिरी बाळगावी, असे अावाहन अाैषध प्रशासनातर्फे करण्यात अाले अाहे. धुलिवंदनाला एकत्र गाेळा हाेवून एकमेकांना रंग लावण्यात येतात. चीनकडून अालेल्या रंगांच्या माध्यमातूनही हा व्हायरस पसरण्याचा धाेका संभवताे. त्यामुळे एकमेकांना रंग लावताना काळजी घ्यावी. खाेकला व इतर संसर्गजन्य अाजार असलेल्यांनी काळजी घ्यावी, असे अावाहन करण्यात अाले अाहे.