• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2023
in Uncategorized
0
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

शिक्षक दिनी करणार एल्गार, शासनाचा करणार निषेध

नागपूर (प्रतिनिधी) – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या  मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षक “शिक्षक दिन” रोजी सामुहिक रजेवर जावून निषेध व्यक्त करणार आहेत. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे आता या  शिक्षकांचेही प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

‌महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घकाळ दुर्लक्षित आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संबंधाने घरभाडे भत्ता कपात करून वेठीस धरले जात आहे. अनुदानित शाळेतील शिक्षकांना व इतर सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या थकबाकीचे चारही हप्ते देण्यात आले. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक शिक्षकांना २ रा, ३ रा, ४ था हप्ता मिळालेला नाही. १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि विषय पदवीधर शिक्षकांना समान न्यायाने पदवीधर वेतनश्रेणी लागू केलेली नाही.

वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा पेन्शनसाठी जोडल्या गेलेली नाही. नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना सातव्या वेतन आयोगासोबतच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळालेली नाही. नगर पालिका, महानगर पालिका शिक्षकांना कोणतीच पेंशन योजना लागू केलेली नाही. अशैक्षणिक व ऑनलाईन कामामुळे दररोजचे अध्यापन कार्य प्रभावीत होत असताना याबाबत कोणतीच कार्यवाही होत नाही. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही नाही. हजारो बेरोजगारांना डावलून कंत्राटी शिक्षण स्वयंसेवक नियुक्त करणे. १२ वी गणित-विज्ञान विषय शिक्षकांना बी एस्सी साठी पुरेशी संधी न देता पदावनत केले जात आहे.

विषय शिक्षक पदावर सरळसेवेने भरती करण्याचे धोरण, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबतचे अविवेकी धोरण, सेवानिवृत्त शिक्षकांना दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊनही उपदान, अंशराशीकरण आणि अन्य लाभ देण्यास शासनाला आलेले अपयश, शिक्षण विभागातील पदावर बी एड नसताना दिल्या जाणाऱ्या नियुक्ती, सातत्याने चालणारे मतदार यादी सर्वेक्षणाचे काम- त्याचा अध्यापनावर होणारा परिणाम, अर्जित रजा रोखीकरण अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत शासनाच्या ढिसाळ धोरणामुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे विपरीत परिणाम होत असताना केवळ शिक्षकांना जबाबदार धरून बदनामी करण्याचे धोरण या कोणत्याच बाबतीत शासन सकारात्मक निर्णय घेत नाही. शिक्षक संघटनांसोबत गांभीर्याने चर्चासुद्धा केली जात नाही.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने मागण्यांच्या सोडवणुकीसाठी विनंती निवेदने दिली आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राजन सावंत, विलास कंटेकुरे, कार्याध्यक्ष सयाजी पाटील, कोषाध्यक्ष नंदू होळकर, महिला आघाडी प्रमुख वर्षा केनवडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, प्रवक्ते नितीन नवले, राज्यातील सर्व शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत तीव्र आंदोलन करण्याची भूमिका मांडली आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/sthanik-swarajya-snsthan/
Previous Post

जीआय मानांकन मिळविण्यात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी

Next Post

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन

अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

April 1, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026
जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon