• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हेमचंद्र पाटील यांना जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2023
in Uncategorized
0
विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हेमचंद्र पाटील यांना जाहीर

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा‍ सन २०२३ चा राज्यपातळीवरील प्रतिष्ठेचा असा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पंचक येथील प्रगतशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे. यावर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी देण्यात येत असून दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनी हा पुरस्कार दिला जाणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाने राज्यपातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार सुरू केला आहे. गतवर्षी सामाजिक क्षेत्रासाठी हा पुरस्कार “भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान” मु. पो. झाराप, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदूर्ग या संस्थेला दिला. यावर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी जाहीर झाला होता. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागविले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यामध्ये भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मुंबई विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रोफेसर संजय देशमुख यांचा या समितीमध्ये समावेश होता. समितीने जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील पंचक या गावातील प्रगतशील शेतकरी हेमचंद्र दगाजी पाटील यांची निवडीची शिफारस केली असून कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी ही शिफारस मान्य केली आहे.

हेमचंद्र पाटील यांनी बीएस्सी, एलएलबी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केलेले असून पंचक येथे ४० एकर बागायती शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यासोबतच दुग्ध उत्पादनाचा पुरक व्यवसायही आहे. कांद्याची गादी वाफ्यावर लागवड करून मायक्रो स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी व्यवस्थापन करून ६० टक्के पाण्याची बचत करीत विक्रमी उत्पादन घेतले. उती संवर्धित केळी लागवड करून ३० महिन्यात केळीची तीन पिके घेवून हेक्टरी १०० टनापर्यंत उत्पादन घेतले. डाळींब, हळद, अद्रक, काकडी, कलींगड यासारख्या विविध पिकांचे विक्रमी उत्पादन हेमचंद्र पाटील यांनी घेतले आहे. त्यांनी शेडनेट हाऊस उभारले आहे. आधुनिक शेती करतांना एकात्मिक सेंद्रीय व रासायनिक पध्दतीचा अवलंब करून एकात्मिक कीड व रोगांचे नियंत्रण करून सेंद्रीय पध्दतीने जमीनीची सुपीकता टिकवत उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या शेतीतील प्रयोगाचा नव्या पिढीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास समितीने व्यक्त करून हेमचंद्र पाटील यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप एकावन्न हजार रूपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांचे हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. याच समारंभात विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांना देखील पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.


 

 

Tags: #jalgaon vidyapitn newshttps://kesariraj.com/bahinabai-purskar-hamchandra/
Previous Post

समर्पण करायला लावणारा फुटबॉल – डॉ.केतकी पाटील

Next Post

जीआय मानांकन मिळविण्यात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यापीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हेमचंद्र पाटील यांना जाहीर

जीआय मानांकन मिळविण्यात राज्याचा क्रमांक अग्रस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon