नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – इंडियन एअर फोर्सचे मिग-२९ फायटर विमान आज दुर्घटनाग्रस्त झाले. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळले. जालंधरमधल्या एअर फोर्सच्या बेसवरुन नियमित सरावासाठी या फायटर विमानाने उड्डाण केले होते.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले. जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-२९ चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
ANI
✔
@ANI
#UPDATE A MiG-29 fighter aircraft crashed today near Hoshiarpur district of Punjab. The pilot managed to eject safely: IAF officials https://twitter.com/ANI/status/1258642637038301184 …
ANI
✔
@ANI
An Indian Air Force fighter aircraft has crashed in Punjab. More details awaited.
View image on Twitter
1,413
12:09 PM – May 8, 2020
Twitter Ads info and privacy
284 people are talking about this
मिग-२९ हे रशियन बनावटीचे विमान असून १९९९ साली कारगिल युद्धात शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता. एअरफोर्सकडे ६० पेक्षा जास्त मिग-२९ विमाने आहेत. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. मल्टीरोल म्हणजेच बहुउद्देशीय प्रकारामध्ये ही फायटर विमाने मोडतात. एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड अशा दोन्ही मिशन्ससाठी ही विमाने उपयुक्त आहेत.







