पुणे (वृत्तसंस्था) – बेल्हे -शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील कपूरवाडीमधील दुग्ध व्यावसायिक मारुती शिंदे यांच्या शेतात बुधवार (दि.6) बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. शिंदे सायंकाळी मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतात 2 बिबट्याची बछडे दिसून आली.

शिंदे यांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली. बेल्हे वनपाल दत्ता फापाळे व वन कर्मचारी जे. टी. भांडलकर यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली. बिबट्याची बछडे मका शेतात निघून गेली होती. बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी शेतकऱ्यांना सुरक्षितेबाबतच्या सूचना दिल्या आहेत.







