मुंबई (वृत्तसंस्था) – राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. गुरूवारी अखेर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड २२ एप्रिल रोजी रात्री उशिराने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आव्हाडांना अचानक ताप आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर २० दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ऑफिस ट्विटरने यासंबंधी माहिती दिली असून वाघ येतोय…लवकरच…नव्या उर्जेसह, असे ट्विट करण्यात आले आहे. आव्हाड यांना डिस्चार्ज दिल्याचे कळल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, त्यांच्या हितचिंतकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.







